आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत उपचार:म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुलेआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार : राजेश टोपे

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंजेक्शन-औषधींचे दरही निश्चित करणार

कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिस आजाराची लक्षणे दिसू लागली अाहेत. वेळेवर निदान होऊन उपचार घेतले नाही तर थेट डोळे व मेंदूवर याचा परिणाम होऊ शकतो. यात उपचारादरम्यान अॅम्फोटेरिसिन नावाचे इंजेक्शन दररोज दोन याप्रमाणे ७ दिवसात १४ द्यावी लागतात. याचा खर्चही मोठा असून सर्वसामान्य माणसाला परवडणारा नाही. यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून राज्यातील एक हजार रुग्णालयात म्यूकरमायकोसिसवर मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जालना शहरातील भाग्यनगरातील दर्शना बंगल्यावर सोमवारी दुपारी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासोबत स्नेहभोजन घेतल्यावर मंत्री टोपे यांनी ही माहिती दिली. टोपे म्हणाले, कोरोनावर उपचार करताना वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनसाठी डिस्टिल्ड वॉटर वापरले नसेल तर रुग्णाच्या तोंडामध्ये फंगस तयार होऊ शकतात. यात ओठाच्या आतून काळे डाग पडतात व त्यानंतर श्वसनासह मेंदूवरही याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...