आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त म्हणे हॉटेल ताजमध्ये मोफत मुक्कामाची संधी! फसवणूक करणारे खोटे मेसेज व्हायरल, बळी न पडण्याचे पाेलिसांचे आवाहन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी युक्ती, हॉटेल ताजकडूनही असा कुठलाही प्रकार नसल्याचा खुलासा

बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी नवी युक्ती काढली आहे. मुंबईच्या जगप्रसिद्ध हॉटेल ताजच्या नावाने व्हॅलेंटाइन डेनिमित्त हॉटेलकडून सात दिवसांच्या मोफत मुक्कामासाह विविध भेटवस्तू दिल्या जाणार असल्याची लिंक व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली आहे. त्यामुळे हॉटेल ताजसह पोलिसांनी अशा कुठल्याही अनोळखी वेबसाइट, लिंकवर जाऊ नये, भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.

तरुण-तरुणींमध्ये व्हॅलेंटाइन डेचा मोठा उत्साह असतो. ७ फेब्रुवारीपासूनच व्हॅलेंटाइन डे साजरा हाेण्यास प्रारंभ हाेताे. त्याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी आता आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवी युक्ती काढली. मागील काही दिवसांमध्ये साेशाल मीडियावर तशा स्वरूपाच्या लिंक व्हायरल होण्यास सुरुवात झाली. यात व्हॅलेंटाइन डेनिमित्त हॉटेल ताजकडून ७ दिवसांचा मोफत मुक्काम तुम्हाला भेट मिळाला आहे. तुमचाही क्रमांक लागू शकतो, त्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा, अशा आशयाचे मेसेज येत आहेत. त्यासोबत हॉटेलकडून आकर्षक गिफ्ट कार्ड‌्स दिले जात असल्याचेही आमिष दाखवण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, या संकेतस्थळावर हॉटेल ताजच्या लोगोचा वापर केल्याने अनेकांचा विश्वास बसत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी त्याचा उल्लेख करत सामान्यांनी अशा कुठल्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले. औरंगाबादमध्ये मंगळवारपर्यंत अशी कुठलीही फसवणूक झालेली तक्रार नव्हती. परंतु नागरिकांनी त्यापूर्वीच सतर्क होण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

हे आहेत धाेके-खासगी माहिती संगणककंटकांच्या हाती जाऊ शकते
व्हॅलेंटाइन डेनिमित्त ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घ्या, अनोळखी संकेतस्थळावरून खरेदी टाळा, वैयक्तिक माहिती शेअर करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
- हे संकेतस्थळ (लिंक) दोन दिवसांपासून सर्वत्र व्हायरल होत आहे. या लिंकद्वारे तुमच्या मोबाइलचा संपूर्ण ताबा सायबर गुन्हेगार घेऊ शकतात. तुमचा खासगी डेटा त्यांच्या हाती लागू शकतो.
- मोबाइलमधील वॉलेट (पैशांचे व्यवहार करणारे अॅप) हॅक होऊन मोठी आर्थिक रक्कम सायबर गुन्हेगार परस्पर वळवतात.

बातम्या आणखी आहेत...