आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना मोफत देवदर्शन:शिर्डी, देवगड, शिंगणापूरचे दर्शन घडवणार- विजय औताडे; गणेश उत्सवानिमित्त महासंघाचा उपक्रम

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री गणेश महासंघाच्या वतीने गणेशोत्सवा दरम्यान विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जाणार आहेत. त्या प्रमुख्याने या वर्षी महिलांसाठी मोफत देवगड, शिर्डी, शिंगणापुर देवस्थानंचे देव दर्शन करून देण्यात येणार आहे. अशी माहिती गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष विजय औताडे यांनी दिली. रविवारी 21 आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गणेश उत्सवादरम्यान दहा दिवस श्रींची स्थापना, महालक्ष्मी देखाव्याचचे ऑनलाईन स्पर्धा, कुस्त्यांची स्पर्धा, हभप ढोक महाराज यांचे किर्तन, ढाल वादक स्पर्धा, तसेच शहरातील योग साधकांचा सत्कार , रोग निदान शिबीर, नृत्य स्पर्धा, विविध शासकिय उपक्रमा अंतर्गत ई-श्रम कार्डचे वाटप, रक्तदान शिबिर, नृत्य स्पर्धा आदी सामाजिक उपक्रम राबवण्यातत येणार आहे. यासह महिलांना देवगड- शिर्डी- शनिशिंगणापूर असे मोफत देवदर्शन देखील घडवले जाणार आहे.

मोफत देव दर्शनासाठी महिलांनी 9764630000 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन महासंघाचे अध्यक्ष विजय औताडे यांनी केले आहे. याप्रसंगी उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी महापौर नंदकुमार घोडेले, अभिजीत देशमुख, विजय वाघचौरे, राजू दानवे, राजेंद्र दाते पाटील आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांसाठी देवा श्रीगणेशा स्पर्धा

शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी देवा श्रीगणेशा स्पर्धा होईल. यात लोककला, बतावणी, नाटक, भारूड, जागरण, गोंधळ, शाहिरी यासह अनेक कला सादर होणार आहेत. यासाठी जिल्हा श्री गणेश महासंघ महोत्सव समितीच्या सहकार्याने युवामित्र फाऊंडेशनच्या वतीने अंतर शालेय व महाविद्यालयीन गटात नृत्य गीत गायन स्पर्धेचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

बुधवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत ही स्पर्धा घेण्याचे नियोजन असून स्पर्धकांनी संयोजक सचिन अंभोरे यांच्याशी किंवा 9970409640 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...