आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेतवन संस्कार:अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास दु:ख, भयापासून मुक्ती : भंते देवानंद

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तथागत गौतम बुद्धांनी दु:ख, भय आणि रोगनिवारणाचा मार्ग सांगितला आहे. आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास या तिन्हीपासून मुक्ती शक्य आहे. बुद्धांनी दिलेला हा संदेश आजच्या काळातही उपयुक्त आहे. या मार्गाचा अवलंब करणारे याची प्रचिती घेत आहेत, असा संदेश भंते देवानंद यांनी दिला.लक्ष्मी कॉलनी येथील चेतवन संस्कार केंद्रात आयोजित धम्म शिबिरात ते बोलत होते. रोगापासून वाचण्यासाठी पंचांग अर्थात पाच अंगांनी केला जाणारा प्रणाम महत्त्वाचा आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.भंते देवानंद बुद्धांच्या आदेशानुसार सातत्याने भ्रमण करून बहुजनांच्या हितासाठी संदेश देत राहतात. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सतत भ्रमण करताना, लोककल्याणासाठी ते विविध ठिकाणी प्रशिक्षण देतात. औरंगाबादेतील वर्षावासातील हे त्यांचे तिसरे शिबिर आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास, स्पर्धा परीक्षा, मोबाइलचा वापर आणि दिनचर्या या विषयावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...