आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य केले. त्यांनी समाजात समरसता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, असे प्रतिपादन राजेश्वर पारवेकर यांनी सोमवारी (६ फेब्रुवारी) केले.श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दासनवमीनिमित्त कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळी नागेश्वरवाडी, सुंदरनगर, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, उदय कॉलनी या भागात भिक्षाफेरी काढण्यात आली. यानंतर संध्याकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राजेश्वर पारवेकर यांचे प्रवचन झाले. पारवेकर म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसुधारक, इतिहासकार, इतिहासाचे भाष्यकार होते. त्यांनी आयुष्यभर देशासाठीच कार्य केले. समर्थ रामदास स्वामीही क्रांतिकारक, समाजसुधारक आणि मानसशास्त्रज्ञ होते. सावरकरांचा समर्थ रामदासांवर खूप अभ्यास होता. स्वातंत्र्य हा सावरकरांचा प्राण होता. सावरकारांनी समाजकार्य केले. त्यांनी सामाजिक समरसता निर्माण केली. त्यांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली.
आचार्य अत्रे यांच्या मनात सुरुवातीला सावरकरांबद्दल गैरसमज निर्माण झाला होता, परंतु त्यानंतर त्यांना सावरकरांबद्दल नितांत श्रद्धा निर्माण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर उदारमतवादीही होते. सावरकरांचे विचार चिंतनीय आणि अनुकरणीय आहेत.’या वेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.