आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबराव पाटील यांची घोषणा:15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यात स्वच्छता ही सेवा उपक्रम, लवकरच सरपंच परिषदही घेणार

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्राच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यात ‘गावांची दृश्यमान स्वच्छता’ ही संकल्पना असून सरपंच परिषदही घेण्यात येईल, असे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

केंद्रीय जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी घेतलेल्या व्हीसीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत राज्यात व्यापक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. गावांमध्ये स्वच्छता, कचराकुंडी आणि अन्य असुरक्षित भागांची सफाई, कचरा स्रोतांच्या ठिकाणी ओला आणि सुका कचरा विलग करण्याबाबत जनजागृती करण्यात येईल. घोषवाक्य, लेखन स्पर्धेच्या आयोजनासह सार्वजनिक प्रतिज्ञांचे कार्यक्रम, रांगोळी, सजावट आणि देखावा स्पर्धा आदी उपक्रम राबवले जाणार आहेत, अशीही माहिती पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...