आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

450 कोटी पाण्यात:2005 ते 2020 पर्यंत औरंगाबादकरांनी मनपाला दिली 450 कोटींची पाणीपट्टी, तरी महिन्यात फक्त 5 दिवस पाणी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणीपट्टी द्यायची ही लोकांची, तर त्यांना पुरेसे पाणी दररोज पुरवायचे ही मनपाची जबाबदारी. त्यानुसार २००५ ते २०२० या १५ वर्षांत औरंगाबादकरांनी पाणीपट्टीतून किमान ४५० कोटी रुपये भरले. पण मनपा मात्र शहरवासीयांना रोज पुरेसे पाणी देऊ शकली नाही. खरे तर १४ वर्षांपूर्वीच २६० कोटीत सर्व जलकुंभामध्ये दररोज मुबलक पाणी आले असते. पण काही नेते-पदाधिकाऱ्यांच्या ‘वाटाघाटी’मुळे तसे झाले नाही. २००५ मध्ये कागदावर उतरवलेली योजना अजूनही कागदावरच आहे. साडेपाच लाख कुटुंबांना महिन्यात ५ दिवस पाणी मिळते अन् तेही जेमतेमच. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पाणीपट्टी ठरवावी, कर्मचाऱ्यांनी ती वसूल करावी आणि त्या मोबदल्यात मनपाने प्रत्येक घराला रोज पाणी द्यावे, अशी रचना प्रत्येक शहरात असते. शहरातील नागरिकांनी १५ वर्षांत ४५० कोटींची पाणीपट्टी भरली, असे अर्थसंकल्पात नोंदवले आहे. एवढ्या रकमेत २००८ मध्येच नवीन जलवाहिनी टाकण्याची तयारी किर्लोस्कर कंपनीने दर्शवली होती, पण नेत्यांनी ते होऊ दिले नाही हे वास्तव आहे. आता आशा १६८०कोटींच्या नव्या जलयोजनेची आहे.

गरज २०६ ची, मिळते ९० एमएलडी
सध्या शहराची लोकसंख्या १७ लाखांच्या घरात आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता दररोज २०६ एमएलडीची पाण्याची गरज आहे. (एक एमएलडी म्हणजे १० लाख लिटर) प्रत्यक्षात ९० एमएलडीच येते. जागतिक नियमानुसार प्रत्येक व्यक्तीला रोज १३५ लिटर पाण्याची गरज आहे, पण औरंगाबादेत दररोज ७० लिटरही पाणी मिळत नाही.

  • सातारा. देवळाई. जटवाडा रोड. पडेगाव. मिटमिटा. हिनानगर. चिकलठाणा. मिसारवाडी. पिसादेवी. भगतसिंगनगरातील सुमारे ७० हजार घरे १५ वर्षांपासून मनपाच्या नळाद्वारे पाणी मिळण्याची वाट पाहत आहेत.
  • औरंगाबादेत सुमारे ५ लाख मालमत्ता. त्यातील ३ लाख घरांत नळ आहेत. पण रेकॉर्डवर अधिकृत जोडणी फक्त १,२५,०००.
  • शहरात तब्बल ४० हजारांहून अधिक अवैध नळ जोडणी आहेत. अधिकृत जोडणीतील ३० ते ४० टक्के लोकच पाणीपट्टी भरतात.

ऑरिक सिटीला १८ महिन्यांत जमले, मनपाला का नाही ?
ऑरिक सिटीसाठी एमआयडीसीने फक्त १८ महिन्यांत जायकवाडीतून बिडकीनपर्यंत पाणी आणले. त्यांना ते शक्य झाले. मग १७ वर्षांत मनपाला जायकवाडीतून नव्या जलवाहिनीने पाणी का आणता आले नाही?
– निखिल भालेराव, शहर अभ्यासक

वार्षिक १२०० रुपये पाणीपट्टीत पुणे, नाशकात रोज मुबलक पाणी
शहर पाणीपट्टी पाणीपुरवठा
जळगाव 2000 रुपये एक दिवसाआड
सोलापूर 1500 रुपये चार दिवसांआड
अहमदनगर 1500 रुपये एक दिवसाआड
नाशिक 1200 रुपये दररोज
पुणे 1200 रुपये रोज पाणी
जालना 2200 रुपये आठ दिवसांआड
अकोला 1440 रुपये चार दिवसांआड

बातम्या आणखी आहेत...