आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी पायपीट:सात वर्षांच्या चिमुकलीपासून ते 75 वर्षांच्या आजीची पाण्यासाठी रोजचीच 4 तास पायपीट; एकाच दिवशी भरतात 3 दिवसांचे पाणी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद शहरापासून किमान दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर म्हैसमाळ रस्त्यावर मातंग समाजाची एक लालमाती वस्ती आहे. यावर ३० पेक्षा जास्त कुटुंबे राहतात. येथील नागरिकांना पाण्यासाठी नेहमीच पायपीट करावी लागते. रोज नवीन पाणवठे शोधून पाणी आणावे लागते.

पाण्यासाठी रोजचे ४ तास खर्च
चार तासांचा वेळ खर्च करणे आता वस्तीवरील महिलांना नित्याचेच झाले आहे. दुपारी सर्व कुटुंबांतील महिला एकत्र येतात अन् पाण्यासाठी त्यांची लगबग सुरू होते. अनेक तास खर्च करून पाणवठे किंवा एका शेतातील विहीर शोधून त्या पाणी भरतात.

२०१४ पासून हद्दवाढीचा प्रस्ताव पडून
खुलताबादेतील १७० घरकुलांना बांधकाम परवानगी मिळाली आहे. १४० घरकुलांचे काम सुरू आहे. त्यापैकी ६० ते ६५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून यामध्ये लालमाती वस्तीवरचे लाभार्थी नाहीत, अशी माहिती सहायक रचनाकार तेजस भोसले यांनी दिली आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून लालमाती वस्तीतील नागरिकांना ना घरकुल मिळाले ना पाणी.

शासनाने शौचालय वगळता या नागरिकांना कोणतीही सुविधा दिलेली नाही.
हा आहे उपाय...

राज्य सरकारने खुलताबाद नगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी १७ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर केला आहे. यातून लालमाती वस्तीपर्यंत पाइपलाइन करून पाणीपुरवठा करता येईल किंवा एक छोटी पाण्याची टाकी उभारून या माध्यमातून पाणीप्रश्न सुटू शकतो.

बातम्या आणखी आहेत...