आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समृद्धी महामार्ग:येत्या एक मेपासून नागपूर ते नाशिक समृद्धी महामार्ग खुला, औरंगाबादेत 37, जालन्यात 13 किमीचे काम पूर्ण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नागपूर ते नाशिकपर्यंतचा महामार्ग मे २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल,’ असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमाेर प्रेझेंटेशन करताना दिला. त्यावर डेडलाइनमध्ये कामे पूर्ण करावीत, असे आदेश देसाई यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्ग आणि समृद्धी महामार्गाची आढावा बैठक घेण्यासाठी देसाई यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, उपविभागीय अधिकारी डॉ.स्वप्निल मोरे, सिल्लोडचे ब्रिजेश पाटील, उपअभियंता व्ही. एन. चामले, एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, शहर अभियंता एस. डी. पानझडे, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे अजय गाडेकर उपस्थित होते.