आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुरणगाव ते पुणतांबा पुलाला १८ कोटी रुपये मंजूर होताच शिंदेसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. एवढा मोठा निधी मंजूर होण्यासाठी शिंदेसेनेचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनीच पुढाकार घेतला होता, असे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यावर या कामासाठी पाठपुरावा केल्याचे लेखी पुरावे आधी सादर करा, असे आव्हान भाजपने शिंदेसेनेला दिले आहे.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी पत्रकार परिषदेत कुणाचेही नाव न घेता सांगितले की, पूल मंजुरीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी पाठपुरावा केल्याचे दस्तएेवज दाखवावेत. भाजपच्या शिष्टमंडळाने किती वेळा गडकरींकडे पाठपुरावा केला, त्याचे भक्कम पुरावो आमच्याकडे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.