आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभगवान महावीर जन्मकल्याणक समितीतर्फे यंदा ‘नवकार कनेक्टिंग पीपल’ची स्थापना करण्यात आली. या उपक्रमांतर्गत समाजातर्फे औरंगाबादमध्ये प्रभागनिहाय महामंत्र जपानुष्ठान केले जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात गुढीपाडव्यापासून शनिवारी (२ एप्रिल) होईल, अशी माहिती उपाध्यक्ष रवी मुगदिया यांनी दिली.
शहरात ११ प्रभागांतर्गत जैन समाजातील ५४ कलश स्थापन करून ३६०० घरांमध्ये जप केला जाणार आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी सिडको (सीमा झांबड, राजेश संचेती, अजित चंडालिया), दक्षिण मध्य (मनीष आंचलिया, पारस बागरेचा, कल्पेश गांधी), अहिंसानगर (जी. एम. बोथरा), वर्धमान रेसिडेन्सी (रश्मी जेलमी, मंगल पारख, सविता लोढा), वेदांतनगर (अनिल संचेती, आनंद सेठी, राजेंद्र पगारिया, संजय भंडारी, विजय अजमेरा), शिवाजीनगर-देशमुखनगर (अमोल पूर्णेकर, राजेश कांकरिया, विनोद गंगवाल), पंढरपूर – वाळूज (संतोष चोरडिया, डॉ. प्रवीण तातेड, चंद्रकांत चोरडिया), शहर मध्य (किशोर संकलेचा, पारस कात्रेला, सावन चुडीवाल, मुकेश साहुजी), हडको (विजय देसरडा, प्रवीण भंडारी, संतोष पापडीवाल, अशोक अजमेरा, मनोज साहुजी, अनिल अजमेरा, मीनाक्षी उदगीरकर) आदी ११ प्रभागांतील प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे, अशी माहिती प्रचार व पंसाद संयोजक नरेंद्र अजमेरा, पीयूष कासलीवाल, प्रकाश कोचेटा आणि अभिजित हिरप यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.