आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमजीएम विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालय, गांधी अभ्यास विभाग तसेच फ्रान्समधील गांधी इंटरनॅशनल अँड कम्युनिटी ऑफ आर्क, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान वर्धा आणि गुजरात विद्यापीठ अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी बहुशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे ‘गांधी आज : शाश्वत समुदायांचा शोध’ या विषयावर आयोजन करण्यात आले आहे. यात जगभरातील तज्ज्ञ आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत. एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात ३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता उद्घाटन होईल. प्रसिद्ध लेखक अशोककुमार पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एमजीएमच्या विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.