आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:सिडको बसस्थानाकतून उद्यापासून विविध मार्गावर नव्याने बस फेऱ्या वाढवल्या

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, यवतमाळसाठी बस धावणार

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सिडको बसस्थानकातून उद्यापासून विविध मार्गावर नव्याने बस फेऱ्या वाढवण्याचा निर्णय विभाग नियंत्रक व आगार प्रमुखांनी घेतला आहे. त्यानुसार मुंबई, पुणे, नागपुर, अकोला, यवतमाळ, नांदेड आदी मार्गावर जाण्यासाठी बसची सोय झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनामुळे प्रवाशांच्या तुलनेत खूपच कमी बस धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत दैनिक दिव्य मराठीने वृत्त प्रसिद्ध करून प्रकाश टाकला होता. बसची संख्या वाढवणे नितांत गरजेचे असल्याचे म्हटले होते. त्याची एसटी प्रशासनाने दखल घेतली असून १४ सप्टेंबर पासून विदर्भ, मराठवाडा, पुणे व मुंबईसाठी नव्याने बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारपासून सिडको पुणे शिवशाही दररोज पहाटे साडेचार वाजता सुटेल, नागपूर शिवशाही सकाळी साडेसहा, मेहकर साधी जल्द साडेसात, यवतमाळ ११.३०, अकोला पहाटे सहा, ६.४५, ८.१५, ९.००, दुपारी ४.३० शिवशाही, ५.४५, लातूर दुपारी सव्वा वाजता, दोन आणि सव्वाचार वाजता, तुळजापूर सकाळी पावणेनऊ वाजता, सोलापुर पहाटे ५.१५ आणि ६.३० वाजता, नांदेड १ वाजता, ८, १० ४, ५ वाजता, सिडको मुंबई रात्री साडेदहा वाजता सुटेल. ऑनलाइन रिझव्र्हेशन वर आगऊ तिकिट बुकिंग करता येईल. अशी माहिती सिडको आगाराचे व्यवस्थापक अमोल भुसारी यांनी सांगितले.