आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Protest In Front Of The District Collector's Office In Aurangabad Salary Of Mathadi Workers In The District Tired, Protests In Front Of The Collector's Office

औरंगाबादमध्ये माथाडी कामगारांचे पगार थकले:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यातील माथाडी कामगारांचे पगार थकल्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

सर्व शासकीय गोदमातील माथाडी कामगारांचे पगार थकले आहेत. जिल्ह्यांतील शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांचे एप्रिल 2022 चे पगार 17 जून 2022 झाले. हे पगार (2 महिने उशीरा ) झाले असून मे महिन्याचे अद्याप एकाही गोदामाचे पगार झाले नाही. ही अत्यंत गंभीर बाब असल्यामुळे माथाडी कामगारांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर लाक्षणिक उपोषण करण्यात येत असल्याची माहिती माथाडी कामगारांचे नेते सुभाष लोमटे यांनी दिली.

वेळेच्या आत पगार नाही

लोमटे म्हणाले की, सर्व आस्थापनांनी शासकीय गोदामाचे कंत्राटदारांसह... दर महिन्याचे 5 तारखेच्या​​​ आत, माथाडी मंडळात पगार जमा करणे बंधनकारक आहे. मात्र असे असताना देखील कंत्राटदार कधीही 5 तारखेचे आत पगार भरीत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.5 तारखेचे आता ने कंत्राटदार माथाडी मंडळात पगार भरणार नाहीत, त्यांना 10% दंड आकारला जाईल हे जिल्हाधिकारी वारंवार सांगत असले तरी या तरतुदीची अंमलबजावणी करीत नसल्याने, कंत्राटदार कधीही वेळेच्या आत पगार करत नाहीत हे वास्तव आहे.

त्यांचे करार रद्द करा

माथाडी कामगारांचे पगार त्यांचे बँक खात्यावर दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जमा व्हायलाच हवेत, पण ते कधीही होत नाहीत. कंत्राटदार/ मालक 5 तारखेचे आत पगार मंडळात भरणार नाहीत, त्या सर्व कंत्राटदारांची l(करार) तात्काळ रद्द करावेत अशी मागणी आहे.... जिल्हयातील माथाडी कामगाराचे अनेक कायदेशीर प्रश्न वारंवार प्रयत्न करूनही सोडविले जात नाहीत. त्यामुळे याकडे गंभीरपणे लक्ष नाही दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला

बातम्या आणखी आहेत...