आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:घरफोडीतील फरार आरोपी दीड वर्षानंतर अटकेत, दागिने केले जप्त

छत्रपती संभाजीनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीड वर्षापूर्वी झालेल्या घरफोडीतील आरोपी निष्पन्न करून जवाहरनगर पोलिसांनी तेव्हा चोरीला गेलेले अडीच तोळे सोने व चांदीचे दागिने जप्त केले. संतोष हरिभाऊ लहाने (३०, रा. इंदिरानगर, गारखेडा) असे त्याचे नाव असून रेल्वेस्थानक परिसरातून त्याला अटक करण्यात आली. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक वसंत शेळके प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करत होते. या वेळी त्यांना दीड वर्षापूर्वी घरफाेड्या केलेला संतोष लहाने रेल्वेस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली. अंमलदार मारुती बबन गोरे, चंद्रकांत पोटे यांच्यासह त्यांनी दुपारपासून सापळा रचला. सायंकाळी संतोष दिसताच त्याच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत त्याने घरफोड्यांची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...