आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मिळणार:शाैचालय स्वच्छतेसाठी निधी मिळणार, शालेय शिक्षण विभाग अवर सचिवांचे परिपत्रक खंडपीठात सादर

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील स्वच्छतागृहात नियमित सफाईच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यासाठी सादिल अनुदानातून निधी वापरला जाईल, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढले आहे.

अॅड. निकिता नारायणराव गोरे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून शाळांमधील स्वच्छतागृहात पुरेशी स्वच्छता नसणे आणि शासनाच्या धोरणानुसार सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनअभावी शाळकरी मुलींना कुचंबणेला सामोरे जावे लागत आहे. याबाबत उच्च न्यायालयाने शासनाला नोटीस बजावून याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी काय पावले उचलली याबाबत स्पष्टीकरण मागितले. त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत सॅनिटरी नॅपकिन आणि स्वच्छतागृह स्वच्छतेसाठी सादिल अनुदानातून निधी देण्यात येईल, असेे परिपत्रक अवर सचिव प्रवीण मुंडे यांनी सादर केले आहे.

शाळेत मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडिंग मशीन ठेवणे अनिवार्य असताना अनेक ठिकाणी मशीन नाही. काही ठिकाणी मशीन आहे तर त्यात सॅनिटरी नॅपकिन नसतात. यामुळे मुलींच्या शाळा सोडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे याचिकेत नमूद केले होते.

बातम्या आणखी आहेत...