आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकुल बालक मंदिरमध्ये विज्ञाननगरीत विद्यार्थ्यांसह पालकांनी अनुभवल्या गमती-जमती:बच्चे कंपनीसोबत आई- बाबांनी घेतला डांबर गोळी, फुग्यांच्या डॉलचा आनंद

प्रतिनिधी|छत्रपती संभाजीनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकुल बालक मंदिरमध्ये बालवाडीतील मुलांसाठी व पालकांसाठी विज्ञान नगरीतून फेरफटका' हा उपक्रम घेण्यात आला. यात बच्चे कंपनीसोबत आई- बाबांनी घेतला डांबर गोळी, फुग्यांच्या डॉलचा आनंद घेतला. औचित्य होते, सिडको परिसरातील मुकुल बालक मंदिर शाळेत विज्ञाननगरीत बालवाडीत घेण्यात येणारे 25 ते 30 वैज्ञानिक प्रयोग मांडण्यात आले होते.

वैज्ञानिक निर्माण व्हावा

बालवयातील मुलांना त्या प्रयोगामधील वैज्ञानिक तत्व माहित व्हावे. हा या उपक्रमामागील हेतू होता तसेच विज्ञानातील विविध गमती-जमतींचा अनुभव घेऊन मुलांमध्ये उपजतच असणारी जिज्ञासू वृत्ती वाढीस लागावी, विविध गमतीचे कुतूहल वाटून हे असे का ? तसे का ? अशा विविध प्रश्नांचा शोध घेण्याची शोधक वृत्ती निर्माण व्हावी. यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. यातूनच भावी काळात विद्यार्थ्यांमधून संशोधक, वैज्ञानिक निर्माण व्हावा असेही शिक्षकांनी सांगितले.

पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालकांनी देखील या विज्ञाननगरीत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. अनुभव घेतला. यात घरातील सहज उपलब्ध असणाऱ्या छोट्या छोट्या साहित्यातून, पदार्थातून आणि निसर्गनिर्मित हवा, पाणी यांचा वापर करून आपण मुलांना विविध अनुभव देऊ शकतो. हे पालकांना समजले. पालकही या विज्ञानातील गमतीजमतीत करण्यात रममान झाले होते.

दीप प्रज्वलन करून सुरुवात

विज्ञान नगरीची सुरुवात छोट्या बाल वैज्ञानिकांच्या हस्तेच पाण्यातील दीप प्रज्वलन करून केली. काही बालके छोटी वस्तू भिंगातून कशी मोठी दिसते हे बघण्यात गुंग होते. तर, काहीजण डांबर गोळीचा नाच बचत होते काढलेले चित्र हाताने किंवा खोड रबर न वापरता कसे गायब होते हे पाहून अचंबित होत होते. तर ग्लास ठेवल्यावर नाणे कसे गायब होते हे बघून आश्चर्यचकित होतं होते. एका मेणबत्तीच्या अनेक प्रतिमा आरशात बघून अबब करत होते. बाटलीत खडू फुंकून फुंकून आत घालण्याचा प्रयत्न करत होते तरीही तो बाहेर पडत होता. अशा अनेक गमती जमती चा आनंद मुलांनी लुटला. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुरेश परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

बातम्या आणखी आहेत...