आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यूची नोंद:व्हिसेराच्या अहवालानंतरच पुढील कारवाई होणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चार महिन्यांपूर्वी तिसऱ्या पत्नीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारांसाठी पैसे नसल्याने सासूच्या मदतीने भाड्याच्या घरातच स्वयंपाकघरात पुरून तिच्यावर अंत्यसंस्कार केल्याची कबुली काकासाहेब भुईगड याने वाळूज पोलिसांकडे दिली होती.

या प्रकरणी वाळूज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी चौकशी केल्यानंतर काकासाहेब आणि त्याच्या सासूला सोडून दिले होते. या प्रकरणात शवविच्छेदन अहवालाचा व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.

पुन्हा भाड्याच्याच घरात
पत्नीला घरात पुरल्यानंतरही काकासाहेब एक महिना त्याच घरात राहत होता. आता तो पंढरपूर परिसरातील भाड्याच्या खोलीत राहत आहे. पत्नीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगत तिचा मृतदेह पुरणाऱ्या पतीकडे किरायाचे पैसे देण्यासाठी पैसे येतात कुठून असा प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...