आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकीची तयारी सुरू:जी-20 : शहर विकासासाठी मिळतील 300 कोटी रुपये ; रस्ते, चौक सुशोभीकरणाठी केंद्राचा निधी

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील २० प्रमुख देशांच्या ‘जी-२०’ या संघटनेची बैठक पुढील वर्षी भारतात होत आहे. अनेक सत्रांमध्ये होणाऱ्या बैठकीतील काही सत्रे, कार्यक्रम औरंगाबादमध्ये फेब्रुवारी, मे महिन्यात होतील. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जगभरातील पाहुणे एकाच वेळी शहरात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यानिमित्ताने औरंगाबाद शहर स्वच्छ, सुंदर करण्याची संधी महापालिकेला आहे. या कामासाठी केंद्राकडून निधी मिळेल. ८०० कोटींचे प्रस्ताव पाठवले तर ३०० कोटी रुपये मिळतील, असे सूत्र आखण्यात आले आहे.

जी-२० च्या पूर्वतयारीसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी केलेल्या सूचनेनुसार शहरातील कामांची पूर्ण जबाबदारी मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांच्यावर सोपवली आहे. संभाव्य विकासकामांचे नियोजन तातडीने झाले पाहिजे, अशा मंत्रालय स्तरावरून सूचना आहेत. या निमित्ताने शहराचा चेहरामोहरा बदलता येऊ शकेल. मात्र, त्यालाही पर्यटनस्थळ, ऐतिहासिक स्थळे आणि विमानतळ एवढ्याच मार्गाच्या मर्यादा आहेत. त्यातच दिल्लीकरांच्या कारभारामुळे ८०० कोटी रुपयांची मागणी केली तर ३०० कोटी रुपये मिळतील. म्हणून अचूक प्रस्ताव पाठवण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. निधी नोव्हेंबर महिन्यात थेट महापालिकेच्या तिजोरीतही जमा होऊ शकतो. अर्थात खर्चावर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तालयाची नजर राहणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

‘त्या’ रस्त्यांवर एकही खड्डा नको
जी-२०च्या निमित्ताने शहरात येणारे पाहुणे ज्या ऐतिहासिक स्थळांना भेटी त्या रस्त्यांवर एकही खड्डा नको. पथदिवे सुरू असावेत. चौकातील सिग्नल्सची यंत्रणा सुव्यवस्थित असावी. दुभाजकांमध्ये हिरवळ अथवा आकर्षक झाडे असावीत. ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांचा परिसरही स्वच्छ असलाच पाहिजे, ही कामे मनपाला करावी लागतील.

बातम्या आणखी आहेत...