आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांचे सुशोभीकरण वेगात:‘जी-20’चे पाहुणे मकबरा, औरंगाबाद लेणी, सोनेरी महालचे सौंदर्य न्याहाळणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी- २० निमित्त शहरात डब्ल्यू-२० ची परिषद हाेणार आहे. यासाठी २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान ४५ देशांचे प्रतिनिधी येणार आहेत. ते बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी आणि सोनेरी महालला भेट देतील. त्यानुसार मनपाने या भागात सुशोभीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

महापालिकेने जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहरात सौंदर्यीकरण व सुशोभीकरणाची कामे हाती घेतली आहेत. ती १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जी-२० महिला प्रतिनिधींची परिषद भरवण्यात येणार आहे. विदेशातून येणाऱ्या महिला प्रतिनिधींची राहण्याची व्यवस्था हॉटेल रामा इंटरनॅशनल, हॉटेल विवांतामध्ये करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या दाैऱ्यात भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे शहरातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी केवळ दोन तासांचा वेळ राखीव ठेवला आहे.

राज्य शासनाने पालिकेला दिला ५० कोटींचा निधी शहराच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाने ५० कोटींचा निधी दिला आहे. या अंतर्गत शहरातील ऐतिहासिक वास्तूच्या आजूबाजूचा परिसर, ज्या मार्गाने पाहुणे जाणार आहेत त्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...