आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक हजार कोटींच्या निधीमध्येच मर्यादीत न राहता नवीनतम तंत्रज्ञानाच्या योग्य वापर करून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून नागरिकांना उत्कृष्ट सेवा कशी देता येईल, यावर उपाय करून मला 100 दिवसात दाखवा असे निर्देश काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले मनपा आयुक्त व प्रशासक तथा स्मार्टसिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी मंगळवारी केले. ते स्मार्ट सिटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बोलत होते.
स्मार्ट सिटीद्वारे राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात मनपा प्रशासक आणि नवीन सीईओ जी श्रीकांत यांनी बैठक घेतली. स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, मुख्य लेखाधिकारी उत्तम चव्हाण, स्मार्ट सिटी बस चे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनिकर, विष्णू लोखंडे इ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या प्रकल्पाबाबत प्रशासकांनी सांगितले की, देशामध्ये किंवा जगामध्ये विविध शहर कसे नवीनतम तंत्रज्ञानाच्या वापर करून नागरिकांसाठी सुविधा व सुरक्षा वाढवत आहे, हे शिकून स्वतःचा कौशल्यात वाढ करा. उपलब्ध संसाधन वापरून मनपा व स्मार्ट सिटीचे उत्पन्न कसे वाढवता येतील यावर कार्य करावाच लागेल असे त्यांनी सांगितले.
दिल्ली मेट्रो, मुंबई लोकल सारखी बससेवा स्मार्ट करा
प्रवाशांना बसेसच्या अचूक वेळ कळेल यासाठी बस शेल्टरवर 'जीपीएस'युक्त डिजिटल फलक लावण्यास आणि 100 दिवसात उबर ओला सारख्या अचूक मोबाइल ॲप सिस्टीम स्मार्ट बस शी संगलनित करण्यास, नवीन सीईओंनी बस विभागाला आदेशित केले. यामुळे उत्पन्न दुगुना व्हायला पाहिजे.
स्मार्टस्कूल द्वारे शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे
स्मार्ट सिटी स्कूल प्रकल्पामध्ये छात्रांना उत्कृष्ट दर्ज्याचा शिक्षण मिळेल ह्यासाठी सॉफ्टवेअर तयार करून शिक्षण विभागाला उपलब्ध करून द्या. दिल्लीचा सरकारी शाळांसारखा स्मार्ट स्कूल चा दर्जा असावा.
त्यांनी मिटमिटा येथे तयार होत असलेल्या सफारी पार्क, जाधववाडी मंडी येथे उभारण्यात येत असलेल्या बस डेपो व अन्य प्रकल्पांना व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी विविध बाबी समजून घेतल्या व संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.