आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी 20 परिषद:प्रशासनासोबत 15 संघटना करणार काम; सर्वांनी मिळून एकत्र उभे राहण्याची गरज

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताकडे जी 20 परिषदेचे यजमानपद 2023 मध्ये आहे. याकरिता देशातील चार शहरात बैठका होणार आहेत. यामध्ये औरंगाबादची निवड झाली असून फेब्रुवारी महिन्यात औरंगगाबादेतील बैठकी होतील. यामध्ये 20 सभासद देश, 9 आमंत्रित देश आणि इतर 14 जागतिक संघटनांचे प्रतिनिधी येतील. यावेळी औरंगाबादचे प्रदर्शन सर्वोत्तम व्हावे याकरीता विविध 15 संघटना मिळून प्रशासनासोबत काम करत आहोत, असे टिम ऑफ असोसिएशनचे तसेच औरंगाबाद फस्टचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी सांगितले.

यावेळी सीएमआयए अध्यक्ष नितीन गुप्ता, इंडस्ट्रीयल सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष सुरज ढुमने, सीआयआय विभागीय अध्यक्ष प्रसाद कोकिळ, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय कांकारिया आणि कल्याण वाघमारे, मासिआचे दुष्यंत आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुप्ता म्हणाले, टीम ऑफ औरंगाबाद हा एक अनौपचारिक मंच आहे. ज्यात शहरातील 15 संघटना एकत्र येऊन काम करत आहेत. जबाबदार नागरिक म्हणून हे संघटन शहरामधे होणाऱ्या जी 20 बैठकीचे उत्कृष्ट आयोजन व्हावे, शहराची उत्तम प्रतिमा निर्माण व्हावी, या उद्देशाने शहर व्यवस्थापनाच्या सोबत काम करत आहे.

कोकीळ म्हणाले, हे शहर सर्वांचे आहे.शहरात होणारी ही बैठक संर्वांसाठी सुवर्ण संधी आहे. यामुळे आपल्या शहराचे मार्केटिंग उत्तमपणे झाले तर पर्यटकांनी संख्या वाढेल, गुंतवणुक येऊ शकते. याचा फायदा शहरातील सर्वच नागरिकांना होईल. याकरीता आमच्यासाेबतच लोकांनी उर्स्फुतपणे पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

ढुमणे म्हणाले, टीम म्हणून आम्ही विविध कामे हाती घेतली आहेत. यामध्ये प्रामुख्याने सिद्धार्थ उद्यान चौक, हर्सुल टी पॉंईंट चौक आणि खाम नदी चौकही आम्ही सुशोभित करणार आहाेत.

यानिमित्ताने विशेष चित्रफीत, पुस्तिका व होर्डिंग द्वारे शहराची प्रतिमा निर्माण करण्यातही आमचे योगदान आहे.

संजय कांकरिया म्हणाले, शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ आणि सुंदर व्हावा याकरीता प्रशासनाच्या हातात हात घालुन आम्ही काम करत आहोत. नागरिकांनीही यामध्ये भाग घ्यावा. सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर शहराची प्रतिमा नक्कीच बदलणार आहे.

बातम्या आणखी आहेत...