आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

G20 परिषदेपुर्वी खबरदारी:दिल्लीगेट ते विमानतळ, महावीर चौकापर्यंत मनपा प्रशासक आणि बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी G-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली गेट ते जळगाव हायवे मार्गे चिकलठाणा विमानतळ ते बाबा पेट्रोल पंप हा रस्ता गुडगुडीत करण्याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्या समवेत महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्याचे निर्देश दिले.

पाहणी दौऱ्याची सुरुवात दिल्ली गेट पासून करण्यात आली होती. जळगाव हायवे मार्गे सिडको बस स्टॅन्ड ते चिकलठाणा विमानतळ ते सेवन हिल, क्रांती चौक मार्गे भगवान महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) येथे आयुक्त व अधिका-यांनी पाहणी केली. यावेळी सदरील रस्त्याचे पॅचवर्क, रस्त्यावर दुभाजक रंगरंगोटी व सौंदर्यकरण, परिषदेसाठी येणारे सदस्यांसाठी स्वागत फ्लेक्स आणि बॅनर्स, ग्रीन बेल्ट विकसित करणे, फुटपाथ सुशोभीकरण, आकर्षक रोषणाई आणि उड्डाणपूलांची सौंदर्यकरण व सुशोभीकरण तसेच वीज खांबांचे सौंदर्यकरण कसा करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी शहर अभियंता एस डी पानझडे, उपसंचालक नगर रचना ए बी देशमुख, उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव, कार्यकारी अभियंता बी. डी. फड, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, कनिष्ठ अभियंता उद्यान विभाग गोपीचंद चांडक, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता डी.डी. उकिरडे, अधीक्षक अभियंता वि. टी. बडे, कार्यकारी अभियंता ए डब्ल्यू येरीकर, शाखा अभियंता अनिल होळकर, वास्तु विशारद रवींद्र कुमार बिरारे व आदींची उपस्थिती होती.

अतिक्रमणावर हातोडा

महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत आज प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळ असलेले बीबी का मकबरा ते पानचक्की व पाणचक्की ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ रस्त्याकडे जाणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणधारकाविरुद्ध कारवाई करण्यात आली.

आज सकाळी सदर मोहीम चेलीपुरा शहागंज मार्गे बेगमपुरा बीबी का मकबरा लेणी रस्ता याठिकाणी काही नागरिकांनी रस्त्याच्या मधोमध सिमेंटचे ओटे बांधून लोखंडी टपऱ्या टाकल्या होत्या तर काहींनी मकबरा समोरील भागात दहा बाय पंधरा, या आकाराच्या जागेत अतिक्रमणे केली होती सदरील अतिक्रमणे हटविण्यात येऊन किरकोळ स्वरूपाचे साहित्य जप्त करण्यात आले.

यानंतर मिल कॉर्नर ते बारा पुल्ला गेट ते विद्यापीठ रस्ता या ठिकाणी काही नागरिकांनी आपल्याकडील चार चाकी वाहन जसे की क्रेन रोलर आणि इतर खराब झालेल्या चार चाकी रस्त्यावर लावल्या होत्या या सर्व गाड्या काढून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला. लेणी रस्त्यावर काही नागरिकांनी बांधकाम साहित्य टाकल्याने सतत अपघात होत होते .म्हणून आज या ठिकाणी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. शहरातील डाव्या बाजूने जाणाऱ्या वाहनांना अडथळा होऊ नये म्हणून आज शहागंज मंजूरपुरा, चेलीपुरा, राजा बाजार येथील टपऱ्याचे व शेडचे अतिक्रमण काढण्यात आले.

कारवाई रोज होणार

ही कारवाई दररोज शहरात होणार आहे. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपल्या रस्त्यावरच्या अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे नसता जेसीबीच्या साह्याने ते काढण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी महानगरपालिकेच्या वतीने आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...