आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:अभियांत्रिकी शिकताना कौशल्य मिळवा : पुथिया

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“उत्तम करिअरसाठी अभियांत्रिकी शिक्षण घेताना इंडस्ट्री जगताला लागणारी नवीन कौशल्ये आत्मसात करा. त्यावर आधारित प्रोजेक्ट करा. तुमचा बायोडाटा प्रभावी होईल,’ असे आवाहन बंगलोर, रेड हॅट ग्लोबल लर्निंग सर्व्हिसेसचे वरिष्ठ व्यवस्थापक अनीश पुथिया वलप्पील यांनी व्यक्त केले.

एमआयटीच्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, बाजारपेठेच्या मागणीनुसार नवे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. रेड हॅट बदलते तंत्रज्ञान लगेच प्रशिक्षणात आणते. या वेळी अनीश पुथिया वलप्पील यांच्या हस्ते २६ यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात रेड हॅट सर्टिफाइड अॅडमिनिस्ट्रेटर परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्रा. डॉ. माधुरी जोशी, प्रा. मोनाली बाविस्कर, आकाश मिरगे, आकांक्षा त्रिपाठी, रत्नप्रभा पुरंदरे, रघुवीर अवणकर, अभिषेक लकडे, भक्ती तांबडे, रणजित म्हस्के, वरद कस्तुरे, सोहम तिळवणकर, वैभव जोशी, सोमेश तपकिरे, पूजा बैनाडे, श्वेता घोरपडे, शिरीष कुलकर्णी, नीलेश स्वामी, रणजितकुमार हाडोळतीकर, तर रेड हॅट सर्टिफाइड इंजिनिअर परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अनिकेत गिरी, प्रणव कामळसकर, पीयूष कोल्हारकर, आदित्य नेवे, तन्मय नागे पाटील तर रेड हॅट सर्टिफाइड स्पेशालिस्ट इन कंटेनर्स आणि कुबरनिटीज परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्रा. किरण गायकवाड, सागर चव्हाण, अश्विनी म्हसरूप, मोहंमद अजहरुद्दीन अत्कालीकर, पुष्कर पवार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...