आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवचन:स्वच्छता, शांतता, शिस्तीचे पालन करणारे गजानन महाराज मंदिर

धर्मक्षेत्रएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गजानन महाराज संस्थान नावाने १९०८ मध्ये ट्रस्ट स्थापन झाला. भौतिक आणि आध्यात्मिक ग‍रजा पूर्ण क‍रून घेण्यासाठी लोक शेगावला अलोट गर्दी करू लागले. श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगाव गावाच्या मधोमध आहे. हे मंदिर काळ्या पाषाणाचे आहे. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. वरच्या बाजूला राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती स्थापल्या आहेत. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री ९.३० वाजेपर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली स्वच्छता, शांतता, शिस्त आहे.

कर्मचाऱ्यांची तसेच सेवेकऱ्यांची भक्तांशी उत्तम तसेच प्रेमळ वर्तणूक.. दर्शनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केलेली अाहे. दुपारच्या वेळी सर्व भक्तांना भोजन प्रसाद वाटतात. भोजनस्थळदेखील अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटके असून सेवेकरी प्रेमाने भक्तांना जेवायला वाढतात. दरवर्षी आषाढी एकादशीकरिता पंढरपूरला पायदळ वारी निघते. जवळपास ५०० हून अधिक किमी प्रवास ही पायदळ वारी करते. या वर्षी या पालखीचा मार्ग बदलला होता. रामनवमी, श्री गजानन महाराज प्रकट दिन, समाधी सोहळा मोठ्या उत्साहाने येथे साजरा केला जातो.

कसे जाल : महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. येथे रेल्वे थांबतात स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त १५ मिनिटांचा रस्ता आहे. स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे १७२ बसेस येतात. त्याव्यतिरिक्त देवास-उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांहूनही बसेस चालतात.

बातम्या आणखी आहेत...