आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धेला लुटले:गजानन महाराज मंदिरात आलेल्या वृद्धेला लुटले

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गजानन महाराज मंदिरात गुरुवारी दर्शनासाठी आलेल्या वृद्धेला अन्नदान असल्याचे सांगत एकाने लुटले. भामट्याने वृद्धेला मंदिराच्या विरुद्ध दिशेला नेत तिच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले. गुरुवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली.

जाधववाडीतील गोकुळनगरमध्ये राहणाऱ्या गजराबाई नरसिंग सुंदरडे दर गुरुवारी गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी जातात. ८ डिसेंबर रोजी एका तरुणाने त्यांना रस्त्याच्या पलीकडे पिठले-भाकरीचे अन्नदान सुरू असल्याचे सांगितले. मी तुम्हाला घेऊन जातो, असे म्हणत त्याने वृध्देसोबत रस्ता ओलांडला आणि त्यांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने पळवले.

बातम्या आणखी आहेत...