आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागारखेडा परिसरातील गजानन महाराज (शेगाव) मंदिर विश्वस्त मंडळातर्फे ‘श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी’ म्हणजे औरंगाबाद ते शेगाव अशी पायी पालखी २१ डिसेंबरला निघणार आहे. २५० भाविक असलेली ही दिंडी ३० डिसेंबरला पोहोचेल. दिंडीचे हे १४ वे वर्ष आहे. यामध्ये फक्त पुरुष वारकऱ्यांचा समावेश असेल. पालखीत चांदीचा २ किलोचा मुखवटा आणि ५ किलोच्या चांदीच्या पादुुका २ लाखांच्या रथातून नेल्या जातील.
विश्वस्त प्रा. श्रीधर वक्ते म्हणाले, १० दिवसांची दिंडी ३० गावांत थांबणार आहे. दिंडीत २१ ते ५० वयोगटातील पुरुष भक्तांना सहभागी होता येईल. सर्वांसाठी शुद्ध पाणी, निवास व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधाही दिली जाणार आहे. या वेळी उद्धव शिंदे, प्रभाकर ताठे, नारायण खडतकर, सतीश सातपुते, प्रकाश काकडे, ललित सोनवणे उपस्थित होते.
२१ डिसेंबरला सकाळी ७ वाजता शोभायात्रा : पालखीची सुरुवात २१ डिसेंबरला सकाळी ७ वाजता शोभायात्रेने होईल. गजानन महाराज मंदिरापासून शोभायात्रा निघेल. पुंडलिकनगर, एन-३, कॅनॉट, बजरंग चौकमार्गे एन-७ येथील मैदानावर दिंडी येईल. रस्त्यात १६ भजनी मंडळेही सहभागी होतील.
औरंगाबादच्या दिंडीला शेगावमध्ये मानाचे स्थान यंदा मंदिर प्रशासनाने पालखीसाठी नवा रथ बनवला आहे. देखण्या रथात सागवानाच्या पालखीत पादुका आणि मुखवटा ठेवला जाईल. रथाचे काम सुरू आहे. ही दिंडी एक अद्भुत अनुभव आहे. शेगावी वर्षभरात ३ हजार पायी दिंडी येतात. यामध्ये औरंगाबादच्या दिंडीला मानाचे स्थान आहे. - डॉ. प्रवीण वक्ते, विश्वस्त मंडळ अध्यक्ष तथा दिंडीचे संचालक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.