आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी प्रेम:मैत्रिणीने केलेल्या तक्रारीबाबत विद्यापीठाकडूनही खरडपट्टी होताच 3 तासांत गजाननने पेटवून घेतले

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीएचडी संशोधक गजानन खुशाल मुंडे (३०, रा. दाभा, ता. जिंतूर) हा सतत पाठलाग करून त्रास देत असल्याची तक्रार त्याची मैत्रीण पूजा कडुबा साळवे (२८, दहेगाव, रा. सिल्लोड) हिने पोलिस ठाण्याबरोबरच विद्यापीठ प्रशासनाकडेही पाठवली होती. सूत्रांनुसार, १८ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाला ती तक्रार मिळाली. त्यांनी २१ नोव्हेंबरला गजाननला बोलावून घेत चांगलीच खरडपट्टी काढून समज दिली. यानंतर सुमारे तीन तासांतच त्याने मैत्रिणीला कॉलेजमध्ये गाठून तिच्यासह स्वत:ला पेटवून घेतल्याची माहिती समोर आली आहे. यात गजाननचा मृत्यू झाला, तर पूजावर घाटीत उपचार सुरू आहेत.

गजानन व पूजा एमएस्सीपासून एकमेकांना ओळख होते. गजानन प्राणिशास्त्र विषयात, तर पूजा बायोफिजिक्स या विषयात पीएचडी संशोधन करत होती. मात्र, गजाननने एकतर्फी प्रेम सुरू केले. पूजाचा त्याला नकार होता. पण त्याने सतत पाठलाग करणे, बोलण्यासाठी हट्ट करणे, वारंवार कॉल करण्याचे प्रकार सुरू केले, अशी तक्रार पूजाने १७ नोव्हेंबर रोजी बेगमपुरा पोलिसांत केली होती. विद्यापीठालाही तिने पोस्टाद्वारे तक्रार पाठवली. १८ नोव्हेंबर रोजी ती प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने गजाननला बोलावून तंबी देत कारवाईचा इशाराही दिला होता. वेळीच हे प्रकार बंद केले नाहीत तर ‘पीएचडी’ही करता येणार नसल्याचे खडसावले होेते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गजानन तणावात गेला. दोन वाजता पूजाचे कॉलेज गाठून तिच्यासह स्वत:ला पेटवून घेतले, अशी माहिती समोर आली.

मोबाइल मात्र सापडेना घटनेनंतर गजाननचा मोबाइल अद्यापही सापडलेला नाही. पोलिसांच्या तांत्रिक तपासात मोबाइल शेवटच्या घटनास्थळाजवळच असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तेथे पोलिसांनी बराच शोध घेऊनही तो मिळून आलेला नाही. संस्थेचे सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बंद असल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत.

महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपासासाठी एसआयटीची स्थापना केली. उस्मानपुऱ्याच्या निरीक्षक गीता बागवडे या विशेष तपास पथकाचे प्रमुख आहेत. मुकुंदवाडीच्या उपनिरीक्षक गुळवे, सायबरचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण, अंमलदार समाधान काळे यांचा पथकात समावेश आहे. सहायक आयुक्त अशोक थोरात हे मार्गदर्शक असतील.

बातम्या आणखी आहेत...