आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लिव्ह इन’मधील तरुणाची आत्महत्या:प्रेयसीला उद्देशून चिठ्ठी लिहून घेतला गळफास

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिव्ह इन रिलेशनशिपमधील ३० वर्षीय तरुणाने प्रेयसीचे दुसऱ्यावर प्रेम असल्याच्या संशयातून गळफास घेत आत्महत्या केली. मुकेश नागोराव गाव्हदे (३०) असे त्याचे नाव आहे. जवाहरनगर परिसरात शनिवारी दुपारी हा प्रकार समोर आला. मूळ बुलडाणा तालुक्यातील चोंडी गावचा असलेला मुकेश शहरात केटरिंगमध्ये काम करत होता. त्याची एका तरुणीशी ओळख झाली. त्यातून प्रेमाचे संबंध तयार झाले. ते बालाजीनगरमध्ये खोली करून सोबतच राहू लागले.

मात्र, नंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. शनिवारी दुपारी खोलीवर एकटा असताना त्याने गळफास घेतला. जवाहरनगर पोलिसांनी त्याला घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने प्रेयसीला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत‘तू जो मुलगा पाहिला असशील, त्याच्यासोबत खुश राहा,’ असा मजकूर लिहिला आहे.

बातम्या आणखी आहेत...