आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरिपाच्या हंगामात मका, कपाशीसह अन्य पिकांना अतिवृष्टीचा माेठा फटका बसला. उरल्यासुरल्या कपाशीलाही भाव मिळाला नाही, अाता कांद्याच्या उत्पादनातून तरी भरघाेस उत्पन्न निघेल, अशी अाशा असतानाच दाेन वेळा गारपिटीचा अाणि अधूनमधून सुरू असलेल्या अवकाळी पावसात ८०० क्विंटल कांदा शेतातच भिजून माेठे नुकसान झाले.
जवळपास चार लाख रुपयांचाही खर्च पाण्यात गेला. परिसराम आस्मानी संकटाने कहर करूनही कोणी जबाबदार नेतृत्व फिरकले नाही. हा एक जुगार खेळण्यासारखाच प्रकार अापल्यासाेबत घडल्यामुळे हताश झालेल्या वैजापूर तालुक्यातील ज्ञानेश्वर तुकाराम उगले (३५, रा. बाेरदहेगाव) या तरुण शेतकऱ्याने चक्क ‘मी शेतीचा जुगार खेळताे, मला अटक करून जेलमध्ये टाका’ अशी अजब मागणीच पाेलिस व महसूल प्रशासनाकडे केली असून याबाबतची व्हिडिअाे क्लिपसुद्धा सर्वत्र व्हायरल झाली अाहे.
गारपिटीचा मारा, पावसाच्या तडाख्यात शेतातच ८०० क्विंटल कांद्याची माती डाेळ्यादेखत भिजत असलेला कांदा पाहून त्यांनी पावसातच ट्रॅक्टरमध्ये कांदा भरण्याचा प्रयत्न केला असता टपाेऱ्या गारपिटीने झाेडपण्यास सुरुवात केली. त्यामुळे कांदा तिथेच पडून राहिल्याने गारपिटीचा मारा अाणि पावसाच्या तडाख्यात जमा केलेले कांद्याचे ढीग भिजून मातीत मिसळले. यात ८०० क्विंटल कांद्याचे नुकसान झाले. उसनवारी करून ४ लाखांहून अधिक केलेला खर्चही पाण्यात गेला. यामुळे उगले कुटुंब हताश झाले.
शेतीच्या जुगारात सर्व काही हरलो शेतीच्या जुगारात सर्व काही हरलो, म्हणत शेतकरी ज्ञानेश्वर उगले यांनी संतापून वैजापूरच्या पोलिस अधीक्षक महक स्वामी अाणि तहसीलदार यांना व्हिडिअाे क्लिपच्या माध्यमातून अावाहन केले की, जुगार खेळणे हा अपराध अाहे. माझ्यासारखे शेतकरी दरवर्षी शेतात लाखो रुपयांचा खर्च करून जुगार लावतात व हे पिकवलेले हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी, गारपीट क्षणात हिसकावून नेतात.
लाखोंचे नुकसान होते, पण सरकारी मदत तर सोडाच, एकही महसूल व कृषी विभागाचा अधिकारी, कर्मचारी साधा पंचनामा करण्यासाठी आमच्या बांधावर येत नाही, हीच आमची मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे दरवर्षी शेतात पीक पिकवण्यासाठी हजारो रुपयांचा जुगार लावणाऱ्या मला व माझ्यासारख्या सर्व शेतकऱ्यांना अटक करा, कारण आम्ही दरवर्षीच आमच्या शेतात लाखोंचा जुगार खेळतो अन् जुगार खेळणे हा कायद्याने गुन्हा आहे. म्हणून आम्हाला जेलमध्ये टाका, अशी भावना उगले यांनी व्यक्त केली आहे.
माेठ्या उत्पन्नाचे स्वप्न मिळाले धुळीस शेतकरी ज्ञानेश्वर उगले हे स्वत:ची दाेन एकर अाणि त्यांच्या काकाची पाच एकर शेती बटईने करतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, अाई-वडील, भाऊ-भावजय असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून अाहे. साडेपाच एकरात त्यांनी कांदा लागवड केली होती. खूप मेहनत करून शेतात पिकवलेल्या कांद्याची काढणी करून शनिवारी जमा करणे चालू होते. अचानक अालेल्या वादळासह पावसात काढलेला कांदा पूर्ण भिजला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.