आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:मंगळागौरनिमित्त ‘गौराई’चे खेळ ; परंपरा टिकवण्यासाठी विविध कार्यक्रम

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावणातल्या सरी आणि सृष्टीने पांघरलेला हिरवागार शालू लेवून हा भक्तीचा, सोहळ्याचा, व्रतवैकल्यांचा महिना येतो. या महिन्यात मंगळागौरही येते. नववधूला माहेरी जाण्याची ओढ असते. मंगळागौरीनिमित्त नानाविध पारंपरिक खेळ खेळले जातात. हेच खेळ हा वसा पुढच्या पिढीला देता यावा हा उद्देश समोर ठेवून गौराई ग्रुपच्या वतीने मंगळागाैरी कार्यक्रम घेण्यात येतो.

१७ आॅगस्ट राेजी झालेल्या कार्यक्रमात फेर, फुगड्या, ताकाचा डेरा, झुकु लुकू लुकू, सईबाईचा कोंबडा, आगोटा पागोटा, भावनिक नाटुकलं, आई मी येऊ का, आळुंकी साळुंकी, गाठोडे, पिंगा, सासू-सुनांचं भांडण, जावाजावांचं भांडण, झिम्मा अादी खेळ खेळण्यात अाले. जनजागृतीसह नात्यांमधील गुंता सोडवण्याचा अट्टहास, धमाल मस्ती ही कार्यक्रमाची वैशिष्ट्ये ठरली. ग्रुपमधे सुनीता बडवे, सीमा कुलकर्णी, प्रगती कुलकर्णी, नीलिमा भालेराव, मनीषा मैराळ, आश्लेषा मोताळे, मधुरा मोकाशे, स्वाती पांडव, वैशाली दंडे, रूपाली शेंडे, मोहिनी जोशी, मीना चौहान, पल्लवी पालोदकर यांनी वेगवेगळे खेळ सादर केले.

बातम्या आणखी आहेत...