आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथम वर्धापन दिन सोहळा:एशियाड कॉलनीत 40 लाख खर्च करून गणपती मंदिर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा परिसरातील एशियाड कॉलनी भागात महेश्वर काळा गणपती मंदिर स्थापन होऊन वर्ष पूर्ण झाले. या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने मंदिरासह सभामंडपाचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले.शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात माजी नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे पाटील, मंदिराचे अध्यक्ष योगेश डिगुळे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव पांडुरंग गंभीरे, सिद्धार्थ दहिवाल, कोषाध्यक्ष देविदास शंकेपल्लू यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. एक वर्षापूर्वी महेश्वर काळा गणपतीची पत्राच्या शेडमध्ये स्थापना केली होती. दरम्यान, मंदिरासाठी असलेल्या २७ -२८ गुंठ्यामध्ये बांधकाम तसेच सभामंडप बांधण्यात येणार आहे. या कामासाठी ४० लाखांचा निधी लागणार असल्याचे कोषाध्यक्ष शंकेपल्लू यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...