आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाचा करा शुभारंभ:मातीचे गणराय रिद्धी-सिद्धीसहित घरात राहतील, गणरायाच्या मूर्तीचे घरातच विसर्जन करून स्थायी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव पूर्णत्वाच्या दिशेने आहे. गणरायाचा जयघोष आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या प्रेमळ उद्घोषासह आज आपण गणपती बाप्पाचे विधिपूर्वक विसर्जन करणार आहोत. आपण घरात मातीच्या गणरायाची स्थापना केली. १० दिवस पूजा-अर्चना केली. आता त्यांचे विसर्जन घरातच करायचे आहे. मातीचे गणराय विसर्जनानंतरही ऋद्धी-सिद्धीसोबत कायम घरातच राहतील. बुद्धी-विवेक, श्रमाचे सामर्थ्य आणि यश निश्चित देतील. घरात विसर्जनाचा विधी एवढा सरळ, पवित्र आणि निसर्गप्रिय आहे की तो सर्वांसाठी मंगलकारक असेल.

मातीच्या कुंडीत गणपती विसर्जन करून तुळस लावल्यास अखंड आशीर्वाद मातीच्या गणरायाचे घरातच एका कुंडीत विसर्जन करा. या मातीत तुळशीचे रोप लावा. त्यामुळे गणरायाचा शुभाशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. वर्षानुवर्षे घरात गणरायाचा आशीर्वाद स्थायी राहील. गणेशोत्सवानिमित्त मातीच्या गणरायाच्या परंपरेचा हा शुभारंभ आपल्यातर्फे निसर्गाला दिलेली भेट असेल... आणि भविष्यातील पिढ्यांसाठी तो एक संस्कारही असेल.

बातम्या आणखी आहेत...