आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​हिंगोलीत गणेशमुर्ती विसर्जनाला सुरवात:पालिकेच्या कृत्रिम तलावामुळे भाविकांची सोय; 885 ठिकाणी गणशमुर्तीचे विसर्जन होणार

हिंगोली2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोलीत गणेशमुर्ती विसर्जनाला रविवारी ता. 19 सकाळपासून सुरवात झाली आहे. हिंगोली पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावामुळे भाविकांची सोय झाली असून शहरातील सहा ठिकाणी या तलावात गणेशमुर्ती विसर्जन केले जात आहे. सायंकाळी उशीरा पर्यंत गणेशमुर्ती विसर्जन होणार आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरात कोविडमुळे गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुकी पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. मात्र त्यानंतरही पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरासह जिल्हाभरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हिंगोली शहरातील भाविकांची सोय व्हावी यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या पुढाकारातून कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहे. या ठिकाणी डॉ. कुरवाडे, बाळू बांगर यांच्यासह पालिकेचे कर्मचारी तैनात आहेत. त्यांच्या मार्फत गणेशमुर्ती स्विकारून कृत्रिम तलावात विसर्जन केले जात आहे. सायंकाळी उशीरा पर्यंत हिंगोली शहरात 59 ठिकाणी गणेशमुर्ती विसर्जन केले जाणार आहे. तर जिल्हाभरात 885 ठिकाणी गणेशमुर्ती विसर्जित केली जाणार आहे.

हिंगोली शहरात एनटीसी मध्ये महेश उद्यान, महात्मा गांधी चौक, नवीन नगर परिषद इमारत, अग्नीशमन केंद्रा जवळ तसेच शिवाजीनगरातील दत्त मंदिर, आदर्शन कॉलनीमध्ये पाण्याच्या टाकी जवळ कृत्रिम तलाव उभारले आहेत. या शिवाय दोन फिरते विसर्जन कुंड शहरात फिरविले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...