आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखी व तोंडी स्वरूपात तक्रार:के-सेक्टरमधील हरित पट्ट्यात कचरा पेटवला

वाळूज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक परिसरातील के सेक्टरमध्ये वारंवार रसायनयुक्त कचरा जाळला जात आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे येथील उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात अनेकदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच एमआयडीसी प्रशासनाकडे लेखी व तोंडी स्वरूपात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने उद्योजकांनी ‘एमईसीसी’च्या माध्यमातून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा ठराव घेतला आहे. त्यांच्याकडूनही दुर्लक्ष झाल्यास उद्योजकांतून थेट मुंबई कार्यालयात तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजकांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...