आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनोपयोगी साहित्याचे वाटप:होप फॉर हेल्पिंग हँड तर्फे गरजूंना मदत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

होप फॉर हेल्पिंग हँड संस्थेतर्फे दिव्यांग, अनाथ आणि वेगळ्या मुलांच्या शाळा, संस्थांना आवश्यक शैक्षणिक तसेच जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती चुडीवाल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी नारेगावातील अस्थिव्यंग आणि मतिमंद शाळेस वह्या, पेन, पेन्सिल तर शाळांसाठी ५० ब्लँकेट, १०० चादरी, फ्रिज आणि किराणा साहित्य देण्यात आले.

सिडकोतील बालिकाश्रमात नववी, दहावीच्या विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक शुल्क, शालेय साहित्य, किराणा सामान दिले. बोरवाडीतील दैवत वृद्धाश्रमात वस्त्रदान, अन्नदान करण्यात आले. आधार केंद्रातील अनाथांसाठी किराणा साहित्याचे वाटप केले. या वेळी धनश्री जैन, सोनल तातिया, वंदना गुजराती, रागिणी शहा, नूतन पारीख, दीपिका राणा उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...