आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत चढ्या दराने पेट्रोलची विक्री:औद्योगिक परिसरातील पेट्रोल पंपावर चढ्या दराने पेट्रोल विक्री, ऑनलाइन केली तक्रार

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज औद्यौगिक वसाहती जवळ असलेल्या तिसगाव शिवारातील सिडको वाळूज महानगर-१ येथील नायरा रामा पेट्रोलियमवर 124.32 रुपये या चढ्या दराने पेट्रोल विक्री होत असल्याने पेट्रोल टाकण्यासाठी आलेल्या कामगार ग्राहकांनी वाढीव दारावर आक्षेप घेत पेट्रोलच्या दराबाबत नायराच्या ग्राहक सेवा क्रमांकावर फोन करून आपली तक्रार नोंदवली. प्रत्येक्षात पेट्रोल दर 119.28 रुपये लिटर असताना चढ्या दराने पेट्रोलची विक्री होत आहे.

नेमके प्रकरण काय?

याबाबत अधिक माहिती अशी की, वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव ते तिसगाव या सिडकोच्या मार्गावर असणाऱ्या नायरा पेट्रोल पंपावर 17 जून रोजी रात्री 8.20 वाजता वाढीव दराने पेट्रोल विक्री होत असल्याची तक्रार करत ग्राहकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर फोन करत पेट्रोलच्या दरा संदर्भात चौकशी केली असता सदरील दर हा 119.28 रुपये असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात कंपनीच्या वतीने ग्राहकांची ऑनलाइन तक्रार (सीसी-३०१४) नोंद करून घेतली. तसेच यापुढे ग्राहकांना वाढीव दराने पेट्रोल विक्री होणार नाही असे सांगितले. यासंदर्भात संबंधित पेट्रोल पंपचालक संदीप राठोड यांनी असे सांगितले की, नायरा कंपनीच्या वतीने आम्हाला दररोज पेट्रोल-डिझेलच्या दरा संदर्भात ई-मेल येतो त्यानुसारच आम्ही पेट्रोल विक्री करत असतो.

एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार जनतेला महागाईचा सामना करावा लागू नये म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे पेट्रोलपंप चालकांकडून नागरिकांची फसवणूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे्. आता यावर काय कारवाई करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...