आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायरान अतिक्रमण प्रकरण, 'लालबावटा'चा मोर्चा:शासनाने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीने पैठणगेट ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2022 रोजीच्या निकालाद्वारे महाराष्ट्रातील 2 लाख 22 हजार 153 अतिक्रमणे 31 डिसेंबर 2022 पर्यंत काढून टाकण्याचे निर्देश सरकारला दिलेले आहेत. यामुळे गायरानावरील लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिसकावून घेतले जात आहे, त्यामुळे शासनाने त्याचा विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आल्याची माहिती राम बाहेती यांनी दिली आहे.

राम बाहेती यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे गायरान जमिनीवर अतिक्रमण करणे. आपला उदरनिर्वाह करणाऱ्याच्या विरोधात निकाल देणे ही गंभीर बाब असल्याचे आमचे मत आहे. हजारो दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीय व विविध जातीतील भूमीहीन, श्रमिक, शेतमजुरावर अन्याय करणारा हा निकाल आहे.

अनुसूचित जाती-जमाती व विविध जातीतील भूमीहीनांनी केलेल्या बहुतांश अतिक्रमित जमिनीवर कुठलेही बांधकाम करण्यात आलेले नाही. हे भूमीहीन फक्त पोट भरण्यासाठी जमीन कसतात ही बाब माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणने आवश्यक आहे. काही बेघर भूमीहीन गुंठा दीड गुंठा जमिनीवर घरे बांधून राहात आहेत हे खरे आहे परंतु त्यांचे देखील अतिक्रमणे 1990 पूर्वीची आहेत.

या केल्या मागण्या

मुंबई उच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या निकालाला स्थगिती मिळण्यासाठी पुनर्विचार याचिका शासनाने उच्च न्यायालयात सादर करावी. सर्वोच्च न्यायालयाने 28 जानेवारी 2011 रोजी दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयातही महाराष्ट्र शासनाने पुनर्विचारार्थ याचिका दाखल करावी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या घटना पीठाची यासाठी स्थापना करण्याची महाराष्ट्र शासनाने मागणी करावी.

बेघर करू नका, क्रांतिकारी निर्णय घ्या

गरिबांची घरे पडू नयेत त्यांना बेघर करू नये .कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान भूमिहीन योजनेअंतर्गत गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याचा क्रांतिकारी निर्णय राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षात निमित्त महाराष्ट्र शासनाने घ्यावा. राजकारणी. भूमाफिया, धनाढ्यांनी केलेली अतिक्रमणे तातडीने हटवावीत अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राम बाहेती, गणेश कसबे ,अशोक जाधव कैलास कांबळे ,अशफाक सलामी ,अभय टाकसाळ यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...