आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसुल अन पोलिस विभागाची संयुक्त कारवाई:भगवा शिवारात पुर्णा नदीपात्रातून बोटीद्वारे वाळू उपसा करणारी बोट जिलेटीनने उडवली

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औंढा नागनाथ तालुक्यातील भगवा या गावाच्या शिवारातून वाहणाऱ्या पुर्णा नदीच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा होऊ लागला होता

औंढा नागनाथ तालुक्यातील भगवा शिवारातील पुर्णा नदीच्या पात्रातून बोटीद्वारे वाळू उपसा करणारी बोट गुरुवारी ता. 6 दुपारी दोन वाजता नदीपात्रातच जिलेटीनद्वारे उडवून देण्यात आली. महसुल व पोलिस विभागाने ही संयुक्त कारवाई केली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील भगवा या गावाच्या शिवारातून वाहणाऱ्या पुर्णा नदीच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा होऊ लागला होता. रात्रीच्या वेळी वाळूने भरलेले टिप्पर भरधाव वेगाने धावत होते. यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, भगवा शिवारात नदीतून बोटीद्वारे वाळूचा उपसा करून साठा केला जात असल्याची माहिती महसुल विभागाला मिळाली होती.

त्यावरून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार कृष्णा कानगुले, नायब तहसीलदार सचिन जोशी, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, शरद नाईकनवरे यांच्या पथकाने आज दुपारी दोन वाजता भगवा शिवारात भेट देऊन पाहणी केली.

यावेळी बोटीद्वारे वाळू उपसा होत असल्याचे आढळून आले. या पथकाचे बोटीची तपासणी करून मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही पुढे आले नसल्याने अखेर जिलेटीनच्या कांड्यांद्वारे ही बोट उडवून देण्यात आली. त्यानंतर महसुल विभागाच्या पथकाने परिसरातील इतर ठिकाणीही वाळूघाटांना भेट देऊन पाहणी केल्याचे महसुल विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...