आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:अ‍ॅण्टिजेन टेस्ट किट खरेदीस सर्वसाधारण सभेची मान्यता

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सिल्लोड तालुक्यातील विविध विकास कामांसह रस्ते व पूल दुरुस्ती कार्यक्रमाला तसेच रॅपिड अ‍ॅण्टिजेन टेस्ट किट खरेदीस मान्यता देण्यात आली. आर्थिक तरतुदीसंदर्भातील आयत्या विषयाला मंजुरी न देता यासाठी नव्याने सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश जि.प. अध्यक्षा मीना रामराव शेळके यांनी यावेळी दिले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी जि.प. अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने मुख्य सभागृहात घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, सभापती अविनाश गलांड, किशोर बलांडे, मोनाली राठोड, अनुराधा चव्हाण, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या उपकराच्या २० टक्के निधीमधून कोरोना संसर्गास प्रतिबंध करण्याच्या पार्श्वभूमीवर मागासवर्गीयांना कृषी सौरपंप पुरविणे  या योजनेच्या १ कोटीमधून २० लाख रुपये ग्रामीण भागातील मागासवर्गीय कुटुंबांना सॅनिटायझर वाटप करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. सन २०१८-२०१९ मधील जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेच्या अखर्चित निधीस २०२०-२१ या आर्थिक वर्षात खर्च करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. दरम्यान आयत्या विषयाला मंजुरी देण्यावरून सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.