आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता महापालिकाच चालवणार प्रकल्प:नक्षत्रवाडीत मार्चअखेर कचऱ्यापासून वीजनिर्मिती

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात संकलित केल्या जाणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प मनपाकडून नक्षत्रवाडीत सुरू करण्यात आला होता. हा प्रकल्प इंदूरच्या बँको सर्व्हिसेसला चालवण्यास देण्यात आला होता. मात्र, ही कंपनी १० लाख रुपयांचे वीज बिल थकवून पळून गेली. आता हा प्रकल्प मनपाच चालवणार असून मार्चअखेर या ठिकाणी वीजनिर्मिती सुरू होईल, असे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी (२ मार्च) सांगितले. या प्रकल्पात दररोज किमान २० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार आहे.

नक्षत्रवाडी येथे ३० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून बायोगॅस व वीजनिर्मिती केली जाणार होती. त्यानुसार इंदूरच्या बँको सर्व्हिसेसला हे काम देण्यात आले. दररोज २० टन ओला कचरा कंपनीला दिला जात होता, पण हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी कंपनीने टाळाटाळ केली. दरम्यान, या केंद्राचे १० लाखांपर्यंत वीज बिल थकले. ते बिल कंपनीने भरले नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने केंद्राचा वीजपुरवठा तोडल आहे.

प्रकल्पाची तपासणी सुरू कंत्राटदाराने या ठिकाणी केलेले काम करारानुसार आहे का? यासह इतर बाबींची तपासणी सध्या सुरू आहे. असे असले तरी मार्चअखेरीस हा प्रकल्प सुरू होईल. - डाॅ. अभिजित चौधरी, महापालिका प्रशासक

बातम्या आणखी आहेत...