आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर नंबरी सोने:शंभरपैकी शंभर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींची औरंगाबादमध्ये घोड्याच्या रथातून जंगी मिरवणूक

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात असलेल्या ज्ञानेश विद्यामंदिर शाळेतील दोन विद्यार्थिनींनी दहावी परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवले. या गुणवंतांची घोड्याच्या रथातून जंगी मिरवणूक काढून आनंद साजरा करण्यात आला.

ज्ञानेश विद्यामंदिर शाळेतील 176 विद्यार्थी दहावी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 172 विद्यार्थी 75 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले. स्नेहल सूर्यवंशी व करिष्मा राजभर या विद्यार्थिनींनी 100 पैकी 100 गुण घेऊन शाळेची यशाची परंपरा कायम ठेवली. चैतन्य वाघ या विद्यार्थ्यांने 98 टक्के गुण घेतले. यावेळी संस्थेच्या सचिव मीनाक्षी विटोरे, उपाध्यक्ष पूजा पऱ्हे, अध्यक्ष शैलेंद्र विटोरे, संचालक रजनी परमेश्वर, मुख्याध्यापक रामनाथ पंडूरे, उपमुख्याध्यापिका संजीवनी आरदवाड यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या विजयी मिरवणुकीत परिसरातील बहुसंख्य पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

अतिशय गरीब कुटुंबातील स्नेहल सूर्यवंशीचे वडील सुतार काम करतात. आई गृहिणी आहे. तर करिष्मा राजभरचे पालक अतिशय गरीब असून छोट्याशा कंपनीत कामगार म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.

बातम्या आणखी आहेत...