आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनधिकृत नळ कनेक्शन घेतलेल्या नागरिकांना आता दंडाची रक्कम भरावी लागणार नाही. वर्षभरासाठी आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीचे २०२५ रुपये भरून नळ अधिकृत करून दिले जाणार आहेत. त्यासाठी महाअभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी फीडर लाइनवरील कनेक्शन, व्यावसायिक नळ कनेक्शन तोडण्यात येणार आहेत. मात्र, निवासी अनधिकृत नळ कनेक्शन न तोडण्याची भूमिका घेण्यात आली. शहरात सध्या सव्वा लाख नळ अनधिकृत नळ आहेत. त्या नागरिकांनी २०२५ रुपये भरल्यास नळ कनेक्शन अधिकृत केले जातील. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाने केले आहे. जुने पाइप बदलण्याचा प्रस्ताव उद्याच्या बैठकीत : नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यापूर्वी पाणीपुरवठा वाढवण्यासाठी जुन्या ७०० मिमी योजनेचे पाइप बदलण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली होती. मात्र, ठाकरे सरकारच्या बहुतांश निर्णयाला नवीन सरकारने स्थगिती दिली आहे. हे पाइप बदलण्यासाठी सुमारे १९३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावात ७०० मिमीची पाइपलाइन बदलणे, एमबीआर, सम्प बांधणे, पंप हाऊस आदी कामे केली जाणार आहेत. तांत्रिक मान्यतेसाठी हा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आलेला आहे. आता रविवारी होणाऱ्या बैठकीत हा विषय मांडला जाणार आहे.
जायकवाडीमधून ३० एमएलडी पाणी वाढणार
शहरात आता तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्याची अडचण आहे. विविध उपाययोजना राबवल्यानंतर हर्सूल आणि जायकवाडीतून ३० एमएलडी पाणी वाढणार आहे. दोन ते तीन महिन्यांत ही पाणीवाढ होणार असल्याने तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी साधारणपणे तीन महिने लागणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.