आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात गेल्या २४ तासांत सुराणानगर, किराडपुरा आणि अंगुरीबाग परिसरातील तिघांनी कौटुंबिक वादातून आपले जीवन संपवल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. गेवराईच्या व्यावसायिकाने साेलापूर-धुळे महामार्गाजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर मी चाललो, अशी पोस्ट आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर टोकाचे पाऊल उचलले. चेतन रविंद्र जैस्वाल (४२) असे त्यांचे नाव आहे. चेतन मूळ गेवराईचे असून त्यांचा मद्यविक्रीसह हॉटेल व्यवसाय आहे. दोन मुलांच्या शिक्षणासाठी ते पत्नीसह काही महिन्यांपासून सुराणानगरात राहत होते. ते रागाच्या भरात निघून गेले होते. त्याच्या काही तासांनंतर त्यांनी सोशल मीडियावर मी चाललो, अशी पोस्ट करत मोबाइल बंद केला. त्यानंतर त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकला नाही.
४ एप्रिल रोजी सकाळी सोलापूर-धुळे महामार्गावरील तलवानी शाळेसमोर छोट्या तलावाजवळ लिंबाच्या झाडाला पुरुष लटकल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली. अंमलदार पंढरीनाथ साबळे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली. तेव्हा चौकशीत जैस्वाल यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. दुसऱ्या घटनेत किराडपुऱ्यातील जोहेब खान रऊफ खान (२२) याने रागाच्या भरात १ एप्रिल रोजी रात्री विषारी औषध केले होते.
मात्र, त्याचा घाटीत मंगळवारी मृत्यू झाला. याप्रकरणी जिन्सी पोलिस तपास करीत आहेत. २७ वर्षीय कामगाराचा गळफास तिसऱ्या घटनेत अंगुरीबाग येथील २७ वर्षीय अजीम नजीर शेख याने मंगळवारी पहाटे ५ वाजता आत्महत्या केली. तो मोंढ्यात काम करत होता. काही दिवसांपासून त्याची पत्नी माहेरी गेली होती. मंगळवारी सकाळी तो त्याच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. याप्रकरणी सिटी चौक ठाण्याचे सहायक फौजदार देविदास तुपे तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.