आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातब्बल २ वर्षांनी घनसावंगीच्या मॉडेल कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीची सोमवारी बैठक झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. दोन वसतिगृहांचे प्रस्ताव ‘रुसा’ला पाठवणे, ग्रंथालय अद्ययावत करणे, सौरऊर्जा पॅनल बसवणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे (एनईपी) पदवी स्तरावरील कोर्स तयार करण्यासाठी समित्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
समितीची मार्च-२०२१ दरम्यान ऑनलाईन बैठक झाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या बैठकीला सदस्य प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ. भगवान साखळे आणि प्राचार्य डॉ. सतीश दांडगे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत प्रत्येकी २०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वसतीगृहाचा प्रस्ताव देण्याचा निर्णय झाला. मैदान विकासासाठी आणि ग्रंथालय अत्याधुनिक करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे कुलगुरूंनी आश्वासन दिले. पदवीचे कोर्सेस चार वर्षांचे करण्यासाठी समित्यांचे गठण केले जाईल. सोलार पॅनल बसवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिली जाईल. बीए, बीकॉम आणि बीएस्सीच्या सगळ्या विषयांना एनईपीप्रमाणे चार वर्षांचे करण्याचे निर्देश कुलगुरूंनी दिले.
कॉलेजमध्ये ८०० विद्यार्थी, १२ प्राध्यापक कार्यरत ग्रामीण भागातील ८०० विद्यार्थी असून १२ प्राध्यापक आहेत. इमारत बांधून तयार आहे. कुलगुरूंनी यापुढे उर्वरित कामांना भरीव निधी देण्याचे मान्य केले असून शासनालाही काही प्रस्ताव पाठवले जातील. -डॉ. सतीश दांडगे, प्राचार्य मॉडेल कॉलेज, घनसावंगी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.