आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवती महिलांना करणार मार्गदर्शन:गर्भसंस्कार नवीन पाऊल उपक्रम 12 जानेवारीपासून होणार सुरू

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाळावर चांगले संस्कार करण्याची सुरुवात ही गर्भावस्थेपासून होते. यासाठी गर्भसंस्कार महत्त्वाची पद्धत आहे. बाळाला चांगल्या गोष्टी शिकवणे व सकारात्मक विचार, नैतिक मूल्य गर्भसंस्कारामधून मिळतात. यातून भावी पिढी सुदृढ व सर्वगुणसंपन्न निर्माण व्हावी म्हणून गर्भसंस्काराचे महत्त्व रुजवण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

‘गर्भसंस्कार नवीन पाऊल’ या उपक्रमाची सुरुवात १२ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. यानंतर दर शुक्रवारी आणि शनिवारी गंर्भसंस्कारावर मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाईल. समाजमाध्यमातून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे. आशा, अंगणवाडी सेविका, एएनएम परिचारिका यांच्यामार्फत मोबाइलच्या माध्यमातून हे व्याख्यान गर्भवतींपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...