आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:घरकुल योजना तपासणीचा अहवाल 4 दिवसांत देणार

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेत शहर परिसरातील ७ ठिकाणी ३९,७६० सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. या संपूर्ण प्रकल्पाची स्थळ पाहणी व कंत्राटदाराची आर्थिक व्यवहार्यता तपासणीसाठी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीला सहकार्य करण्यासाठी दोन उपसमित्या स्थापन केल्या असून या दोन्ही उपसमित्यांनी आपला अहवाल १४ डिसेंबरपर्यंत अपर मुख्य सचिव यांच्याकडे सादर करावा, असे शासन आदेशात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. म्हाडाचे उपमुख्य अभियंता राजीव शेठ यांच्या नेतृत्वाखालील समिती पडेगाव, सुंदरवाडी, तिसगाव, चिकलठाणा, हर्सूल येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार आहे.

या बाबी तपासणार
किती जागेवर अतिक्रमण, खदान, तलाव यामुळे बांधकाम शक्य नाही. किती जागेवर प्रत्यक्षात बांधकाम करता येईल.
घरकुले बांधण्यास किती कालावधी अपेक्षित लागणार. आर्थिक व्यवहार्यता तपासणी उपसमिती करणार आहे.
मनपाने प्रसिद्ध केलेली निविदा, निविदा प्रक्रिया शासन निर्णयानुसार व सीव्हीसी मार्गदर्शक सूचनेनुसार झाल्या का?
म्हाडा, सिडको, एएमआरडीए यांनी बांधलेल्या घरकुलांचे दर आणि प्राप्त झालेले दर यांचा तुलनात्मक अभ्यास.
निविदेमधील दर स्पर्धात्मक होते किंवा कसे या बाबतचा अहवाल सादर करणे.

बातम्या आणखी आहेत...