आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच पदे भरणार:घाटीने गट ‘क’च्या 55 रिक्तपदांचा प्रस्ताव पाठवला, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार

प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे राज्यभरात तृतीय श्रेणीच्या (गट क) जागा भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये तांत्रिक पदांसह विविध पदांचा समावेश आहे. घाटीच्या वतीने ५५ पदांसाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच ही पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी दिली.

घाटीत सध्या तांत्रिक आणि अतांत्रिक अशी १७५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १२० पदे भरलेली आहेत, तर ५५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे घाटीच्या वतीने ही रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ही पदे भरल्यास घाटीतील कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. घाटीत लिपिक आणि टंकलेखकाची ३९ पदे असून त्यापैकी २३ पदे भरली आहेत, तर १६ पदे रिक्त आहेत. वरिष्ठ लिपिकाची २३ पदे आहेत. त्यापैकी १३ पदे भरली असून १० पदे रिक्त आहेत. वाहनचालकाच्या ९ पैकी केवळ तीन जागा भरल्या असून सहा जागा रिक्त आहेत. अधिपरिचारिकाच्या सर्व तिन्ही जागा रिक्त आहेत.