आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयवदान जनजागृती अभियान:एम्सच्या धर्तीवर घाटी रुग्णालयाला सर्व सुविधा द्या; भागवत कराड यांची गिरीश महाजन यांच्याकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात भाजपचे सरकार आल्यानंतर एम्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. महाराष्ट्रात नागपूरमध्ये एम्स मंजूर करण्यात आले. एका राज्यात एकच असल्यामुळे घाटीला एम्सच्या धर्तीवरच सर्व सुविधा देण्यासाठी त्याबाबतची शिफारस राज्य सरकारकडून करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. अवयवदान जनजागृती अभियानाचा शुभारंभ कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते.

राज्यस्तरीय ‘अवयवदान जनजागृती अभियान’ चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे पार पडले. यावेळी केंद्रीय वित्तमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. संजय राठोड आदी उपस्थित होते

कंत्राटी पद्धतीने भरावी

यावेळी डॉक्टर कराड म्हणाले की सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये विविध आठ प्रकारच्या सुविधा आहेत. मात्र डॉक्टर नसल्यामुळे या सुविधा देता येत नाहीत त्यामुळे या ठिकाणी कंत्राटी पदावर डॉक्टरांची भरती करण्यात यावी गेल्या महिन्यात मी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट देऊन आढावा घेतला आहे या शहरातील तज्ञ डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केल्यास शहरातल्या डॉक्टरांची मदत घेऊन चांगल्या पद्धतीच्या सेवा मराठवाडा मिळू शकतील असे कराड यांनी सांगितले. तसेच जिरीयाट्रिक विभागासाठी रिजनल सेंटर सुरू करण्यात यावे यासाठी की केद्रीय स्तरावर मागणी केली आहे. राज्य शासनाकडून त्याबाबतचा प्रस्ताव देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अवयव श्रेष्ठ दान

डॉ. कराड म्हणाले की, अवयवदान हे जगातील सर्व श्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्युनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयवदान केल्याने एक देह अनेक जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. अवयवदान ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

अवयवदान चळवळ व्यापक व्हावी

सहकार मंत्री सावे म्हणाले की, अवयवदान चळवळ व्यापक करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कोविड काळात घाटीमध्ये अनेक रुग्णांना जिवदान मिळाले आहे. घाटीमध्ये सर्व डॉक्टर्स निष्णांत असून येथे उपचार देखील खुप चांगल्या प्रकारे मिळतात असेही ते म्हणाले.