आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात घटस्थापना:खंडोबा मंदिरात घटस्थापना; 5 दिवसांचे व्रत

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षीप्रमाणे यंदाही खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी करण्यासाठी तयारी सुरू झाली. २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात आली. यात खंडोबाला पुणेरी चांदीचा तुरा असलेल्या पगडीसह फुलांनी सजवले. येत्या २९ तारखेपासून सातारा परिसरातील खंडोबाची यात्रा सुरू होणार आहे. गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास पुजारी दिलीप धुमाळ, विजय धुमाळ, विशाल धुमाळ, आकाश धुमाळ, अध्यक्ष कुटुंब परिवाराच्या हस्ते अभिषेक करण्यात आले.

खंडोबाला पुणेरी पगडी, चांदीचा कंबरपट्टा : खंडोबा मंदिराला तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. गुरुवारी घटस्थापना करून खंडोबा देवाला खास पुण्याहून आणलेली सुरेख पुणेरी पगडी, चांदीचा तुरा लावला आहे. पुरातन चांदीचा कंबरपट्टा लावला आहे. गुलाबाच्या फुलांनी सजावट करण्यात आली.

घरोघरी घटस्थापना व उपवास : मंदिरासह धनगर समाजबांधव घरोघरी घटस्थापना करून पाच दिवस उपवास करतात. घटाला सकाळ-संध्याकाळ हळदी-कुंकू, फळांचा नैवेद्य दाखवला जातो. चंपाषष्टीला स्नान करून पूजन केले जाते. देवाला भरीत व कांद्याची पात ठेवतात. घोंगडीवर पूजेचे ताट, कलशाला स्वस्तिक व पाने लावून दिवटी पेटवतात.

पहाटे दर्शनासाठी ३० - ४० भाविकांची उपस्थिती
खंडोबा मंदिरात घटस्थापना करण्यात आली. नवीन वस्त्र चढवण्यात आले. पहाटे ३५ ते ४० भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. दिलीप धुमाळ, मंदिराचे पुजारी

बातम्या आणखी आहेत...